इनऑर्बिट मॉल वाशीमध्ये फादर्स डे साजरा करा अन् बंपर बक्षिसे जिंका

मुंबई : इनऑर्बिट मॉल वाशीने वडिलांसाठी खास फादर्स डे सेलिब्रेशन, धमाल खरेदी आणि आकर्षक बक्षिसांसह यंदा खास सरप्राईज तयार केले आहे. ‘फादर्स डे’ आणि ‘एंड ऑफ सीझन सेल’च्या निमित्ताने, मॉलमध्ये १५ जूनपासून खास उपक्रम आणि ऑफर्स सुरू होणार आहेत.

१५ जून, रविवार रोजी ‘द रेमंड शॉप’ आणि ‘एथनिक्सच्या बाय रेमंड’ यांच्या सहकार्याने खास कॅरिकेचर अ‍ॅक्टिव्हिटीचं आयोजन करण्यात आले आहे. वडिलांसोबत या कार्यक्रमात सहभागी व्हा आणि तुमच्या नात्याचं रेखाचित्राच्या माध्यमातून अनोखं स्मरण बनवा. ही कृती फादर्स डे अधिक खास बनवणारी आहे.

इनऑर्बिट मॉलमधील अनेक नामांकित ब्रँड्सवर सध्या ‘एंड ऑफ सीझन सेल’ सुरू आहे. ग्राहकांना ५०% पर्यंत सूट मिळणार आहे. ही खरेदीप्रेमींसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे. २३ जूनपासून ‘शॉपिंग करा अन् जिंका’ या धमाल कॅम्पेनला सुरुवात होणार आहे. २००० किंवा त्याहून अधिक खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला खात्रीशीर गिफ्ट व्हाउचर्स मिळणार आहेत. याशिवाय, मॉलच्या मध्यवर्ती अ‍ॅट्रियममध्ये संपूर्ण आठवडाभर रंगतदार आणि सहभागी करता येतील अशा अ‍ॅक्टिव्हिटीज होणार आहेत, ज्या सर्व वयोगटासाठी खुल्या असतील.

खरेदी केल्यावर मिळणाऱ्या खात्रीशीर गिफ्ट्सशिवाय, दर आठवड्याला लकी विजेत्यांची घोषणा केली जाणार असून त्यांना ट्रॅव्हल ब्लू, प्लम, कुकी मॅन, थर्ड वेव्ह कॅफे सारख्या ब्रँडकडून रोमांचक बक्षिसे देऊन घोषित केले जाईल. एका भाग्यवान खरेदीदाराला बंपर बक्षीस घरी नेण्याची संधी आहे. आणि ते बक्षिस म्हणजे २.३० लाख किमतीची जावा ४२एक्स सिंगल एबीएस अलॉय बाइक मिळेल.

या संपूर्ण मोहिमेदरम्यान इनऑर्बिट मॉल वाशीमध्ये आनंदी, उत्साही आणि कुटुंबवत्सल वातावरण अनुभवायला मिळणार आहे. खरेदी, सेलिब्रेशन, खेळ, गिफ्ट्स आणि खास फादर्स डे हे सर्व काही एकाच ठिकाणी अनुभवायला मिळेल. त्यामुळे या खरेदीची संधी  न सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • Related Posts

    अराइया बाय अज़ा कडून लॅब-ग्रोउन डायमंड ज्वेलरीसह ‘कॉन्शियस लक्झरी’ च्या नव्या युगाची सुरुवात

    मुंबई (महाराष्ट्र), अप्रैल 10 : अराइया बाय अज़ा, एक नेक्स्ट–जनरेशन फाइन ज्वेलरी ब्रँड, आपल्या नैतिक पद्धतीने तयार केलेल्या लॅब–ग्रोउन डायमंड ज्वेलरीद्वारे आधुनिक लक्झरीची व्याख्या नव्याने करत आहे. नवकल्पना, शाश्वतता आणि…

    २०२६ मध्ये तुमचे करिअर बदलू शकणारे टॉप ग्लोबल फायनान्स सर्टिफिकेशन्स

    नई दिल्ली, मार्च 26: वित्त आणि लेखा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ACCA आणि CFA या दोन पदव्या जागतिक स्तरावर अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जातात. २०२६ मधील बदलती आर्थिक परिस्थिती आणि…

    You Missed

    अराइया बाय अज़ा कडून लॅब-ग्रोउन डायमंड ज्वेलरीसह ‘कॉन्शियस लक्झरी’ च्या नव्या युगाची सुरुवात

    अराइया बाय अज़ा कडून लॅब-ग्रोउन डायमंड ज्वेलरीसह ‘कॉन्शियस लक्झरी’ च्या नव्या युगाची सुरुवात

    २०२६ मध्ये तुमचे करिअर बदलू शकणारे टॉप ग्लोबल फायनान्स सर्टिफिकेशन्स

    २०२६ मध्ये तुमचे करिअर बदलू शकणारे टॉप ग्लोबल फायनान्स सर्टिफिकेशन्स

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात जलवाहतूक क्रांती

    ‘टूनसूत्र’ आता १० भाषांमध्ये; मराठीसह ५ नवीन भाषांचा समावेश!

    ‘टूनसूत्र’ आता १० भाषांमध्ये; मराठीसह ५ नवीन भाषांचा समावेश!

    वाशीतील ‘इनऑर्बिट मॉल’मध्ये घुमणार प्रेमाचे वारे! ‘व्हॅलेंटाईन वीक’निमित्त खास उपक्रमांची मेजवानी

    वाशीतील ‘इनऑर्बिट मॉल’मध्ये घुमणार प्रेमाचे वारे!  ‘व्हॅलेंटाईन वीक’निमित्त खास उपक्रमांची मेजवानी

    विस्मरणात गेलेल्या वारशाला नवे प्राण: हरि चंदना आयएएस यांची दृष्टी